फडणवीसांसाठी बागेश्वर यांचं दर्शन...; बच्चू कडूंचा निशाणा

फडणवीसांसाठी बागेश्वर यांचं दर्शन...; बच्चू कडूंचा निशाणा

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर आणि साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या.

मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर आणि साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांचं दर्शन घेतलं. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीसांसाठी बागेश्वर यांचं दर्शन...; बच्चू कडूंचा निशाणा
राहुल गांधींचे मोदींबाबत 'ते' विधान; फडणवीस म्हणाले...

बच्चू कडू म्हणाले की, बागेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. तिथेच विषेय संपला. अनेकांचा चमत्कारावर विश्वास नसतो. फडणवीस यांच्यासाठी बागेश्वर महाराजाचं दर्शन महत्वाचं वाटलं असावं. बागेश्वर बाबा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. साईबाबा यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. सध्या सर्वच ठिकाणी वाद सुरू आहे महाराष्ट्र हा वेगळ्या वळणावर आहे, अशी सूचक विधान त्यांनी केले आहे.

तसेच, मनोज जरांगे पाटील सध्या सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याबाबत बोलताना कडू म्हणाले, मी जरांगे यांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलणं करून दिलं. मराठा आरक्षणावरून जे गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यासंदर्भात मागणी होती महाजन यांनीही जरांगे यांच्याशी संपर्क केला होता. माझा त्या क्षणापुरताच जरांगे आणि मुख्यमंत्र्याच्या चर्चेत सहभाग होता. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे जातीच्या नावाने आणि धर्माच्या नावाने वाद घडू नये सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर, नेते भांडतात मात्र तळागाळातील कार्यकर्त्याचं मरण होतं. आमचं काय जिथे गरम असतं तिथे आम्ही पोळी शेकायलाच बसलोय, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com