राजकारण
“…अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही” - बच्चू कडू
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा कुणबी असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ज्यांच्या सरकारी दफ्तरी नोंदी कुणबी आहेत, त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यास सरकारने सुरू करावे. सरकारने अंत पाहू नये. अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.