बजरंग सोनवणे यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा

बजरंग सोनवणे यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा

अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. बजरंग सोनवणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. पत्रात असे लिहिले की, "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे" असा मजकूर या पत्रावर लिहला आहे. तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे.

दरम्यान, बजरंग सोनवणे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षात प्रवेश करणार आहेत. बीडमधून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसापासून बजरंग सोनवणे नाराज असल्याचे चर्चा रंगल्या होत्या आणि आज बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षात प्रवेश करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com