Chandrashekhar Bawankule: मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर बावनकुळेंचा जोरदार हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule: मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर बावनकुळेंचा जोरदार हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकाला मुलाखत दिली.
Published by :
Dhanshree Shintre

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकाला मुलाखत दिली. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

या मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या मुलाखतीत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठा आरोप केला आहे. या मुलाखतीवरूनच बावनकुळे यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंची मुलाखत ही काळूबाळूचा तमाशा असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान

@narendramodi

जी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते

@OfficeofUT

यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या

@rautsanjay61

यांना मॅनेज मुलाखत दिली.

ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच.

उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.

१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय ?

२. ⁠१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का ?

३. ⁠सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात ?

४. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात ?

५. ⁠उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता ?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे.

जय महाराष्ट्र!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com