Sandeep Kshirsagar | Jaydatt Kshirsagar
Sandeep Kshirsagar | Jaydatt KshirsagarTeam Lokshahi

बीडच्या क्षीरसागर काका- पुतण्यात जुंपली; पुतण्याचे काकाला आव्हान

त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चिन्ह घेऊन निवडणुकीत समोर यावे, असे जाहीर आव्हान त्यांनी काकांना दिले.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना त्यातच दररोज मोठे नवनवीन घडामोडी घडत आहे. याच गदारोळात नेहमी आपल्या वादामुळे चर्चेत असणारे काका पुतणे आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीडचे माजी आमदार यांनी राजकीय वादातून राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, त्यानंतर पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटातून त्यांची हक्कालपट्टी करण्यात आली. त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान दिले आहे.

Sandeep Kshirsagar | Jaydatt Kshirsagar
सुषमा अंधारेंचा नवनीत राणांवर निशाणा; म्हणाल्या, नवनीत आक्कानं...

काय म्हणाले संदीप क्षीरसागर?

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जातो. ज्यांच्याकडे सत्ता आहे. त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर यावं. असे थेट आव्हान यांनी संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना दिले.

पुढे ते म्हणाले की, शहरातील सामाजिक रचना पाहता नगरपालिकेची निवडणुक आघाडीच्या माध्यमातून लढवून ते नंतर प्रवेश करतील असे मानले जाते. जयदत्त क्षीरसागर कुठे आहेत, त्यांची भूमिका काय, असा सवाल करत राजकारणामध्ये भूमिका स्पष्ट असावी लागते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केला आहे हा त्यांचा इतिहास आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चिन्ह घेऊन निवडणुकीत समोर यावे, असे जाहीर आव्हान त्यांनी काकांना दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com