Ramdas Kadam
Ramdas KadamTeam Lokshahi

'करारा जवाब मिलेगा', मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी खेडमध्ये कदमांचे बॅनर चर्चेत

असे किती लांडगे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही वाघ हा सगळ्या पुरून उरतो' अश्या आशयाच्या बॅनरने सर्वाचे लक्ष वेधले आहे.
Published by :
Sagar Pradhan

निसार शेख|रत्नागिरी: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची खेड येते जाहीर सभा पार पडली. या सभेत ठाकरेंनी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीका केली. याच ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनं उद्या त्याच ठिकाणी सभा आयोजित केली आहे. मात्र, या सभेआधी खेडमध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Ramdas Kadam
शिंदे गटाचे बांगर पुन्हा वादात; तरूणाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

खेड मध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोळीबार मैदानावर उत्तर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. सभेसाठी दोन दिवसांपासून गोळीबार मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या राजकीय बॅनरमुळे खेडमध्ये वातावरण तापले आहे. ढाण्या वाघ आणि करारा जवाब मिलेगा अशा आशयाचे बॅनर गोळीबार मैदानाच्या गेटवर लावण्यात आला आहे तर भरणे नाक्यात 'असे किती लांडगे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही वाघ हा सगळ्या पुरून उरतो' अश्या आशयाच्या बॅनरने सर्वाचे लक्ष वेधले आहे. सद्या कोकणात राजकीय शिमग्याचे ढोल जोरात वाजत आहेत त्यातच कदम आणि जाधव यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत माजी मंत्री रामदास कदम नेमके काय बोलणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मात्र सूत्राच्या माहितीनुसार, उद्या रामदास कदम मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com