राजकारण
शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याआधी रोहित पवारांनी केलेलं ट्वीट चर्चेत
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेत प्रतिक्रिया येत आहेत. यातच आज शरद पवारांची येवल्यात सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहीत पवारांनी एक ट्विट केलं आहे. त्यांचे ट्विट चर्चेत आले आहे. रोहीत पवार म्हणाले की, ओढ ‘विठ्ठला’च्या भेटीची!!! कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरीक यांची आज नाशिकला भेट झाली असता आम्ही सर्वजण आमच्या विठ्ठलाच्या अर्थात मा. पवार साहेबांच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं… उद्याचा मा. पवार साहेबांचा दौरा. सकाळी ८ वाजता – मुंबईहून नाशिककडे प्रयाण.मुंबई-नाशिक मार्गाने १२ वाजता नाशिकमध्ये दुपारी १२ नंतर येवल्याकडे प्रयाण. असे रोहीत पवार यांनी ट्विट केलं आहे.