हिवाळी अधिवेशनापूर्वी चमत्कार होऊन मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो; कोण म्हणाले असं?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आमदार भरत गोगावले यांनी कावळ्याची उपमा दिली आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून संजय राऊत एकनाथ शिंदे यांचं सरकार पायाउतार होणार याची रोज नवी तारीख सांगतात. पण तसे घडत नाही. कारण कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत. राऊत बोलतात त्याच्या नेमकं उलटं घडते. त्यामुळे आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करून 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येणार आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी काहीतरी चमत्कार होऊन मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असं भाकीत आमदार गोगावले यांनी केले आहे. स्वतःच्या मंत्री पदाबाबत बोलताना विठुरायाला मंत्री पदाबाबत साकडं घातलंय मात्र त्यांनी मंत्री झालो नाही तरी काही फरक पडत नाही. असं म्हणत मंत्री पदाच्या शर्यतीतून ते बाहेर पडल्याचे संकेत दिलेत. सरकार चांगलं काम करतंय. शेवटी राज्याचा, मतदार संघाचा विकास महत्वाचा आहे.
खासदार शरद पवार यांच्या मनात काय चालू आहे हे कुणीच सांगू शकत नाही. कारण त्यांच्या मनात एक तर ध्यानात एक असते. असा मिश्किल टोला त्यांनी लगावलाय.