विधानसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले भास्कर जाधव; म्हणाले, हक्काची संधीसुद्धा...

विधानसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले भास्कर जाधव; म्हणाले, हक्काची संधीसुद्धा...

राज्यात सत्तांतरानंतर यंदाचे शिंदे-फडणवीसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजले आहे.

निस्सार शेख | रत्नागिरी : राज्यात सत्तांतरानंतर यंदाचे शिंदे-फडणवीसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजले आहे. सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत आक्रमकपणे बाजू मांडत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. परंतु, अद्याप अधिवेशन संपण्यास तीन दिवस बाकी असूनही भास्कर जाधव यांनी सभागृह सोडले आहे. या अधिवेशनात जाणीवपूर्वक माझी हक्काची संधी वारंवार डावलण्यात आली, असा आरोपही त्यांनी जाताना केला आहे.

विधानसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले भास्कर जाधव; म्हणाले, हक्काची संधीसुद्धा...
मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत हलविणार? फडणवीसांनी दिले उत्तर

भास्कर जाधव म्हणाले की, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत उपस्थित राहून कोकणासह राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्याचा माझा प्रयत्न असतो. विधानसभा हे संसदीय लोकशाहीचं असं एक सभागृह आहे जिथे अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देता येतो व त्यासाठी माझा कायम संघर्ष असतो, हेदेखील आपण सर्वजण जाणता. उठावदार कामगिरी करून समाधानाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांना नमस्कार करूनच मी बाहेर पडतो. ही माझी कित्येक वर्षांपासूनची प्रथा आहे. या अधिवेशनात मात्र जाणीवपूर्वक माझी हक्काची संधीसुद्धा वारंवार डावलण्यात आली. त्यामुळे अधिवेशन संपायला तीन दिवस असतानाही आज अत्यंत विषण्ण मनाने विधानभवनातून बाहेर पडावं लागलं, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com