Bhaskar Jadhav : वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा

Bhaskar Jadhav : वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीर सभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल. कारण त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे. असे बावनकुळे म्हणाले होते.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणता, ही व्यक्तीगत टीका नाही का? चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करतात. वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचं नाही. आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही वाटेल ते बोलणार का? वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा. असे भास्कर जाधव म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com