ठाकरेंची ताकद वाढणार; भाऊसाहेब वाकचौरे  उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार

ठाकरेंची ताकद वाढणार; भाऊसाहेब वाकचौरे उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार

भाऊसाहेब वाकचौरे उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

भाऊसाहेब वाकचौरे उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. यानंतर ठाकरे गटातून मोठी आऊटगोईग सुरू झाली होती. माजी आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्ष प्रवेश हा नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आज ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा पराभव केला होता.

काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळं अहमदनगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com