भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार; रुग्णालयात दाखल

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार; रुग्णालयात दाखल

प्राणघातक हल्ल्यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले असून त्यांना देवबंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील सहारनपूरमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या प्राणघातक हल्ल्यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले असून त्यांना देवबंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तपास सुरु केला आहे.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार; रुग्णालयात दाखल
Video : आदित्य ठाकरे यांच्या गाडीला शिवसेना भवनासमोरच अपघात

माहितीनुसार, चंद्रशेखर आझाद फॉर्च्युनर कारमधून देवबंद दौऱ्यावर पोहोचले गेले होते. अचानक त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्यात चंद्रशेखर यांना गोळी स्पर्श करुन गेले आहे. यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्या गाडीवरही गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

पोलिसांनी तपासास सुरुवात केली असून हल्लेखोर हरियाणा क्रमांकाच्या कारमध्ये आले होते आणि त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी एकूण चार राऊंड गोळीबार करण्यात आला. सध्या पोलिसांनी नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत, जेणेकरून हल्लेखोरांची ओळख पटू शकेल.

दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मला नक्की आठवत नाही पण माझ्या लोकांनी त्यांना ओळखले. त्यांची गाडी सहारनपूरच्या दिशेने निघाली. आम्ही यू-टर्न घेतला. घटनेच्या वेळी माझ्या लहानासह आम्ही पाच जण होतो. भाऊ गाडीत होते, असे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com