Abhijit Bichukale
Abhijit BichukaleTeam Lokshahi

भकास झालेल्या कसब्याला आता सजवायला मी येतोय, कसबा पोटनिवणुकीत बिचुकलेंची एंट्री

अभिजीत बिचुकले यांनी पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या नावे उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर आज मंगळवारी शेवटच्या दिवशी बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला.

राज्यात सध्या कसबा- चिंचवड पोटनिवडणुकीवरून प्रचंड घडामोडी घडत आहे. अशातच आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यातच आमदारकी, खासदारकीपासून ते अगदी राष्ट्रपतीपद अशा सर्व निवडणुका लढवलेले बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीत एंट्री केली आहे. बिचुकले यांनी मंगळवारी त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Abhijit Bichukale
आदित्य ठाकरेंच्या 'त्या' आव्हानावर संजय शिरसाटांची बोचरी टीका; म्हणाले, मानगुटीवर अहंकाराचं भूत...

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक वरून टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही म्हणून भाजपवर टिका होत आहे. तर काँग्रेसमध्ये देखील बंडखोरी झाली आहे. त्यातच अभिजीत बिचुकले यांनी पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या नावे उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर आज मंगळवारी शेवटच्या दिवशी बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. त्यानंतर अर्ज भरल्यानंतर बिचुकलेंनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचकुले म्हणाले की, जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणारय. दोन वर्षांपासून मी कसबा पेठेत राहतोय, मग येथील नागरिकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी या परिसरात 'कसबा भकास झाला' असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला आता सजवायला मी येत आहे. असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com