Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

कोकणातील बडा नेता उद्या ठाकरे गटात

उद्धव ठाकरेंना मुस्लिम संघटनेचीही साथ
Published by :
Sagar Pradhan

निसार शेख|रत्नागिरी : शिवसेना पक्ष हातून गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कोकणच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांची उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला मुस्लिमांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर कोकणातील मुस्लीम समाजाला आवाहन केले आहे.

खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या सभेला मुस्लीम समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करणारे प्रसिद्ध पत्रक ठाकूर यांनी जारी केले आहे. महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्या सभेला सर्वांनी पाठिंबा द्यावा. एक लाख संख्येने मुस्लीम बांधव या सभेसाठी उपस्थित राहतील, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला. भविष्यातदेखील आम्ही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊच, असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांची खेडमधील गोळीबार मैदानात सभा होणार आहे. या सभेमध्ये गुहागर मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते हे राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम हे देखील याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट अधिक बळकट होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शिवाय मुस्लिमांना या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना बळ मिळणार आहे.उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेला यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक सज्ज झाले आहेत. ३० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते या सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com