किर्तीकरांविरोधात बाईक रॅली, संजय निरुपमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

किर्तीकरांविरोधात बाईक रॅली, संजय निरुपमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकारणात एकच खळबळ माजली आहे. याविरोधात संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढण्यात येणार होती.

मुंबई : शिवसेनेचे निष्ठावंत खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकारणात एकच खळबळ माजली आहे. अशातच किर्तीकरांनी मतदारांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. यासाठी संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढण्यात येणार होती. परंतु, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

किर्तीकरांविरोधात बाईक रॅली, संजय निरुपमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शिंदे-भाजपमध्ये आलबेल नाही, 2023 ला मध्यावधी : सुषमा अंधारे

गजानन किर्तीकर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे किर्तीकर यांनी उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान केला असून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. यासाठी संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज दुपारी 3 वाजता बाईक रॅली निघणात होती. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी संजय निरुपम ताब्यात घेतले असून त्यांना वर्सोवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तसेच, बाईक रॅलीलाही परवानगी नाकारली आहे. यासंबंधी संजय निरुपम यांनी ट्विटही केले होते.

संजय निरुपम म्हणाले की, आमचे स्थानिक खासदार गजानान कीर्तिकर यांच्या मतदारसंघातील निष्क्रियतेमुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव आणण्याकरीता मी बाईक रॅली काढली होती. आमचा शांततापूर्ण राजकीय कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी देण्याऐवजी पोलिसांनी कोणताही आदेश न दाखवता मला जबरदस्तीने ताब्यात घेतले. पोलीस माझ्या घरात घुसले आणि मला जबरदस्तीने वर्सोवा पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिस का गुंडराज, अशी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com