Rahul Gandhi | Congress
Rahul Gandhi | CongressTeam Lokshahi

भारत जोडो यात्रेवर भाजपची टीका, राहुल गांधींच्या शर्टची सांगितली किंमत; काँग्रेसनेही दिले प्रत्युत्तर

भाजप आणि काँग्रेसमध्ये ट्विटरच्या माध्यमांतून वॉर

काँग्रेसची आज पासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी राहुल गांधी यांनी पायी चालत २० किलोमीटर अंतर पार केले. या यात्रेचा आजचा हा तिसरा दिवस आहे. मात्र, या यात्रे दरम्यान राहुल गांधींच्या टी-शर्टची चर्चा रंगली.

Rahul Gandhi | Congress
Ganesh Visarjan 2022 Live : राज्यात मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन

भाजपने ट्विटर फोटो शेअर करत शर्टची किंमत जाहीर केली आहे. राहुल गांधी यांनी घेतलेल्या टी-शर्टची किंमत 41,257 रुपये आहे. ट्वीटमध्ये लिहिले की, 'भारत देखो.' असे म्हणत राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेची भाजपने खिल्ली उडवली आहे.

त्यानंतर भाजपच्या या ट्वीटला आता काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसने या ट्वीटवर उत्तर देताना लिहलं की, "अरे... तुम्ही घाबरलात का? भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून. मुद्दावर बोला, बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांवर चर्चा करायची असेल तर ही चर्चा मोदीजींच्या 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांच्या चष्म्यापर्यंत जाईल, बोला करायची आहे का?'' असे म्हणत काँग्रेसने भाजपला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com