बाजार समितीत सत्तेसाठी विरोधकांचा हातात हात! राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजपा-काँग्रेस-ठाकरे गट एकत्र

बाजार समितीत सत्तेसाठी विरोधकांचा हातात हात! राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजपा-काँग्रेस-ठाकरे गट एकत्र

राज्यामध्ये भाजपा आणि महाविकास आघाडीचा चांगलाच वाद रंगला आहे. त्यात या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सोबत निवणूक लढवत आहे.

गजानन वाणी | हिंगोली : सेनगाव बाजार समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला दूर करत भाजपा, ठाकरे गट, काँग्रेस एकत्र आले आहेत. राज्यात विरोधात असलेल्या भाजपा मात्र निवडणुकीत एकत्र आलेला आहे. त्यामुळे सेनगाव बाजार समिती निवडणुकीत सरपंच संघटना विरुद्ध भाजपा, ठाकरे गट आणि काँग्रेस अशी निवडणूक रंगणार आहे.

बाजार समितीत सत्तेसाठी विरोधकांचा हातात हात! राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजपा-काँग्रेस-ठाकरे गट एकत्र
मविआ आज आहे, उद्या सांगता येणार नाही; शरद पवारांच्या विधानाचा भुजबळांनी सांगितला अर्थ

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव बाजार समिती ही महत्त्वाची बाजार समिती म्हणून ओळखली जाते. राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा एकमेकांच्या विरोधात लढत आहे. मात्र, दुसरीकडे हिंगोलीच्या सेनगाव बाजार समितीच्या निवणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादीला बाजूला ठेवत भाजपासोबत विभद्र युती करत एकमेकांच्या हातात हात दिला.

या निवडणुकीमध्ये हिंगोली मतदार संघाचे भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदेश देशमुख यांनी एकमेकांच्या हातात हात दिला व राष्ट्रवादीला बाजूला ठेवत अप्पास्वामी पॅनल उभा केला करुन सरपंच संघटना यांनी उभ्या केलेल्या पॅनलचे विरोधात निवडणूक लढवत आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेला एक गट सरपंच संघटनेला साथ देत आहे.

राज्यामध्ये भाजपा आणि महाविकास आघाडीचा चांगलाच वाद रंगला आहे. त्यात या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सोबत निवणूक लढवत असल्याने आपल्या सोयीनुसार कट्टर विरोधक भूमिका बदलण्यास माहिर असल्याच पुन्हा एकदा उघड झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com