Abdul Sattar
Abdul SattarTeam Lokshahi

Abdul Sattar : भाजप नेत्यांची चौकशी केली तर नवीन जेलच उभारावं लागेल

अब्दुल सत्तार यांनी सोडले भाजपवर टीकास्त्र

रवी जयस्वाल | जालना : नवाब मलिक, अनिल देशमुख आणि अनिल परब अशा महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) सरकारमधील नेत्यांवर एका मागोमाग सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) धाडी पडल्या आहेत. यावर शिवसेनेकडून (Shivsena) केवळ सुडापोटी ही कारवाई केल्याची टीका भाजपवर (BJP) केली. तर, आज शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. जालन्यात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते. त्यावेळी ते बोलत होते.

Abdul Sattar
कोरोना झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस राज्यसभेत मतदान करणार?

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, अर्जुन खोतकरांचं राजकीय अस्तित्व मिटवण्याचे काम भाजपकडून करण्यात आले. मात्र. ते पूर्णपणे बाहेर आले. याचा हिशोब त्यांना आता 2024 मध्ये द्यावा लागेल, असे त्यांनी म्हंटले आहे. तर भाजप नेत्यांची चौकशी केली तर सरकारला नवीन जेलच उभारावे लागेल, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

Abdul Sattar
Ashish Shelar : शिवसेनेचा संजय जिंकणार नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना सत्तार म्हणाले की, हे चार आणे राणे फाणे यांनी अजून पूर्णपणे शिवसेना बघितली नाही. त्याचबरोबर रावसाहेब हे दानवे नाही तर दानव आहे, असा निशाणाही त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवेंवर साधला आहे.

Abdul Sattar
महाविकास आघाडीची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक, अपक्षही लावणार हजेरी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com