'देवेंद्र फडणवीस पुन्हा यावे ही तर महाराष्ट्रातील जनतेची इच्छा'

'देवेंद्र फडणवीस पुन्हा यावे ही तर महाराष्ट्रातील जनतेची इच्छा'

मी पुन्हा येईन या विधानावर विरोधकांची टीका; भाजप नेत्याचे प्रत्युत्तर

अमरावती : कर्नाटक निवडणुकादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल विधानाचा पुनरोच्चार केला होता. यावरुन फडणवीसांवर विरोधकांनी टीका केली होती. या टीकेला भाजप नेते अनिल बोंडे यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा यावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. अमरावतीत अनिल बोंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

'देवेंद्र फडणवीस पुन्हा यावे ही तर महाराष्ट्रातील जनतेची इच्छा'
राऊतांना 'कुत्रा' म्हणत सत्तारांचे ओपन चॅलेंज; त्यांनी राजीनामा द्यावा, मीही देईन आणि...

देवेंद्र फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल माहित असावा म्हणूनच त्यांनी मी पुन्हा येईन म्हणतं असतील, असा टोला शरद पवारांनी लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले की, कोण सांगत आहे 16 आमदार अपात्र होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असे लिक होत असतात का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

तर, देवेंद्र फडणवीस पुन्हा यावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राने सुवर्णकाळ पाहिला. कुठलाही डाग लागू देता पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. मात्र, अडीच वर्षात महाविकास आघाडीने हे काम पुसण्याचे काम केलं. बारसु रिफायनरी प्रकल्प, समृद्धी महामार्गात अडथळे आणण्याचे काम महाविकास आघाडी करते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाटते की मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावे, असेही अनिल बोंडे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत हे तोंड फाटेपर्यंत राष्ट्रवादीची स्तुती करत होते. मात्र, त्याच राष्ट्रवादीचे तुकडे पाडण्यासाठी संजय राऊतांनी आजचा अग्रलेख लिहिला आहे. सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांना टार्गेट केला जात असून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम संजय राऊत करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अस्वस्थता सर्वाधिक ही महाविकास आघाडीत आहे. संजय राऊत यांना फोडाफोडीचे काम जमते त्यामुळे राष्ट्रवादीलाही ते फोडणार आहे, अशी जोरदार टीकाही अनिल बोंडे यांनी संजय राऊतांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com