राऊतांना 'कुत्रा' म्हणत सत्तारांचे ओपन चॅलेंज; त्यांनी राजीनामा द्यावा, मीही देईन आणि...

राऊतांना 'कुत्रा' म्हणत सत्तारांचे ओपन चॅलेंज; त्यांनी राजीनामा द्यावा, मीही देईन आणि...

संजय राऊतांवर अब्दुल सत्तारांची घणाघाती टीका

मुंबई : शिवसेना सोडून गेले त्यांची अवस्था उकीरडय़ावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामना संपादकीयमधून शिंदे गटावर केली होती. याला शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार उत्तर दिले आहे. आमच्या मतावर तो राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा आहे, असे प्रत्युत्तर सत्तार यांनी दिले आहे. त्यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं मीही राजीनामा देईन, असे थेट आव्हानच अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांना दिले आहे.

राऊतांना 'कुत्रा' म्हणत सत्तारांचे ओपन चॅलेंज; त्यांनी राजीनामा द्यावा, मीही देईन आणि...
राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटलांची पटोलेंवर जहरी टीका

कुत्र्याची अवस्था त्याचीच झालेली आहे. रोज सकाळी उठतो आणि भुंकतो. त्याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येतं. आमच्या मतावर तो राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा आहे. तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा. मग तो कसा आहे ते कळेल? त्याने राजीनामा दिला तर मी पण राजीनामा देईल. संजय राऊत यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं, असे आव्हानच अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

उध्दव ठाकरेंना सोडून आलोय. माझा इतका कोणताच कृषिमंत्री फिरला नाही. त्यांचं दुखणं वेगळं आहे ते कधीच बांधावर जात नाही. त्यांना बांध माहित असला असता तर बांध फुटला नसता. 40 आमदार गेले नसते, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. याबाबत विचारले असता अब्दुल सत्तार म्हणाले की, धाकधूक आम्हाला नाही. धाकधूक त्यांना आहे. जसा निकाल लागेल तसे ते सगळे चालले जातील. चर्चेप्रमाणे त्यांच्याकडचे लोक आमच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करत आहेत. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्ही सन्मानाने स्वीकारू, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com