Ashish Shelar | Sanjay Raut
Ashish Shelar | Sanjay RautTeam Lokshahi

शेलारांची राऊतांवर सडकून टीका; म्हणाले, आपल्या आवकातीत ...

ज्या संजय राऊत यांनी एकही कधी निवडणूक लढवली नाही. ते आता भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करत असल्याचे शेलार म्हटले.

नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिले. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आता वाद आणखीच तीव्र झाला आहे. सोबतच या निर्णयावरून ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी भाजप आणि न्यायपालिकेवर टीका केली होती. त्यानंतर आता शिंदे गट आणि भाजपनेही राऊतांना उत्तर दिले आहे. राऊतांच्या याच टीकेचा आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील समाचार घेतला आहे.

Ashish Shelar | Sanjay Raut
बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या पायात नेऊन ठेवली; पवार- ठाकरेंवर शाहांचा निशाणा

काय म्हणाले आशिष शेलार?

राऊतांच्या टीकेवर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ज्या संजय राऊत यांनी एकही कधी निवडणूक लढवली नाही. ते आता भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री पदासाठी आणि सत्तेसाठी त्यांनी हिदुत्व सोडले होते. असा निशाणा त्यांनी यावेळी साधला आहे.

पुढे ते म्हणाले की, शिंदे गटाला ज्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात खेचले होते, त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांनी आपल्या परिवारालाही त्यांनी पैशासाठी न्यायालयात खेचले होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. संजय राऊत सध्या ज्या प्रमाणे आता बोलत आहेत. ज्या प्रकारे टीका करत आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी या गोष्टी उद्धव ठाकरे यांना न्यायालयात सांगावे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे आता संजय राऊत आणि भाजप असा सामना पुन्हा एकदा बघायला मिळणार असे देखील त्यांनी स्प्ष्टपणे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com