Satyajeet Tambe| Chandrashekhar Bawankule
Satyajeet Tambe| Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

सत्यजित तांबे यांना भाजपची खुली ऑफर; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होता. या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काल पार पडलीय या निवडणुकीचा निकाल आता 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. यामध्ये नाशिक मतदारसंघाकडे राज्याचे विशेष लक्ष आहे. या मतदासंघातून अपक्ष आमदार सत्यजित तांबे व मविआ समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सामना होता.

भाजपने उमेदवारांबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला. परंतु, अखेरच्या क्षणी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहिर केला. यामुळे सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबेंनी खुली ऑफर दिली.

Satyajeet Tambe| Chandrashekhar Bawankule
MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागांवर यापूर्वी विधानपरिषद निवडणूकीत जे निकाल आले. त्यापेक्षा हे निकाल चांगले असतील. सहा वर्षाच्या निकालात आणि या निकालात भाजप आणि युतीला जास्त यश मिळालं असेल. चार जागा आम्ही लढवल्या होत्या, नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिलं होतं आणि सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपने समर्थन दिलं होतं. स्थानिक स्तरावर सत्यजीत तांबे यांना भाजपने मदत केलीय. या जागेचे निकाल चांगले येतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

सत्यजीत तांबे पूर्ण मानसिकतेने आमच्याकडे आले तर स्वागत आहे. आमची त्यांना भाजपात घेण्याची तयारी आहे. सत्यजीत तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आलेय. सत्यजीत तांबे आले किंवा इतर कुणी आले. पक्षात यायला अडचण नाही. सत्यजीत तांबे आले तर आम्ही स्वागत करु, अशी खुली ऑफरच बावनकुळे यांनी दिली आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत यंदा मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत पुत्र सत्यजित यांना अपक्ष रिंगणात उतरविले. यामुळे कॉंग्रेसने सुधीर तांबे यांचे पक्षातून निलंबन केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com