Chandrashekhar Bawankule | Bacchu kadu
Chandrashekhar Bawankule | Bacchu kadu Team Lokshahi

बच्चू कडूंना विनंती करणार आहे, का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे असे?

आपण सत्ताधारी पक्षांमध्य आहात त्यामुळे सोबत निवडणूक लढवली पाहिजे. अशी विनंती मी बच्चू कडू यांना करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड खलबत सुरु आहे. तर याच गोंधळा दरम्यान दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मात्र आमदार बच्चू कडू यांनी सर्व जागेवर उमेदवार दिले आहे. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule | Bacchu kadu
आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, नवनीत राणांचे मोठे विधान

आमदार बच्चू कडू यांना मी नागपूरला आज भेटणार आहे. आपण सत्ताधारी पक्षांमध्य आहात त्यामुळे सोबत निवडणूक लढवली पाहिजे. अशी विनंती मी बच्चू कडू यांना करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं दोघांचेही विचार हिंदुत्ववादी आहे नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजप पक्षामध्ये यावं त्यांनी वेगळी निवडणूक लढवू नये, त्यांनी भाजपमध्ये येऊन त्यांनी भाजप पक्ष स्वीकारावा. अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com