बावनकुळेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचले; म्हणाले, किंचित सेना...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना नुकताच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. त्यावर आता राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया देखील येत आहे. यावरच बोलताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. आज नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला मतदारांचा मेळावा घेतला. यावेळी बावनकुळे यांनी ही टीका केली आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
उद्धव ठाकरे यांची किंचित सेना आणि वंचित सेना मिळून भीमसेना होऊ शकत नसल्याचा टोला त्यांनी या नव्या आघाडीवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नसून ही किंचित सेना असल्याची टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे डिवचण्याचेच काम या भाजपने केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आता वाढली आहे.