Chitra Wagh | Urfi Javed
Chitra Wagh | Urfi Javed Team Lokshahi

उर्फीवर प्रश्न विचारताच चित्र्या वाघ भडकल्या; म्हणाल्या, नागडी उघडी फिरू....

मात्र मी तिला इशारा दिला असून, ते अजूनही देत असल्याचं त्या म्हणाल्यात.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद हिच्या फॅशनवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्यामधला वाद आता विकोप्याला गेला आहे. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्यातच उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीवर संताप व्यक्त केला.

Chitra Wagh | Urfi Javed
श्रीलंकेच्या गोलंदाजांना विराटने धो,धो,धुतले... एकाच सामन्यात ठोकले एक शतक अन् अर्धशतक

माध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, मी कुठलीही धमकी दिली नसल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र मी तिला इशारा दिला असून, ते अजूनही देत असल्याचं त्या म्हणाल्यात. तर अशी नागडी उघडी फिरू नको एवढंच माझं म्हणणे असून, असे म्हणणे धमकी आहे का? उर्फिने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, तील तक्रार करू द्या अशा तक्रारी होत असतात. पण आमचा आक्षेप फक्त तिच्या कपड्यावर असून, इतर गोष्टींवर नाही. त्यामुळे तिने असे कपडे घालून फिरू नयेत आणि तिला अजूनही आमचा इशारा आहे.असं देखील चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

पुढे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चित्रा वाघ यांच्या संताप पाहायला मिळाला. त्या म्हणाल्या की, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, संभाजीनगरच्या चौकात कोणी उघडी नाचलेली तुम्हाला चालेल का? कपडे घाला एवढेच म्हणतोय आम्ही, व्यक्तिस्वातंत्र्य आहे. तू काय घालायचं आणि काय नाय घालायचं याचं तुला स्वातंत्र्य आहे, पण उद्या तू आपलं अंतरवस्त्र घालून फिरशील तर लोकं दगडाने मारतील की तुला. हेच सांगते मी तुला, कपडे काय घालायचं आणि काय नाही घालायचं याच्याआधी कपडे घालायला शिका. असा संताप वाघ यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com