Chitra Wagh | Manisha Kayande
Chitra Wagh | Manisha KayandeTeam Lokshahi

आधी कायंदेंचा सवाल त्यावर वाघ यांचे जोरदार प्रत्युत्तर; ट्विटरवर शाब्दिक युद्ध

भाजपच्या चित्रा वाघ यांना नंगाटनाच तुम्हाला मान्य आहे का? त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला ताई?

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्र वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यावरून आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांच्यात ट्विटरवरून चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. त्यावरून राजकारण प्रचंड तापले होते. त्यावरूनच आता ठाकरे गट नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना ट्विटरवरून खोचक सवाल केला आहे. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी कायंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Chitra Wagh | Manisha Kayande
नामविस्ताराला विरोध करणाऱ्या शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकरांची युती, फडणवीसांची जोरदार टीका

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

मनिषा कायंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला ताई ? खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे असो. कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे …? बाकी नंगानाच छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार नाहीच.! असा इशारा त्यांनी यावेळी कायंदे यांना दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या मनिषा कायंदे?

नितीन गडकरी यांचा जुना फोटो शेअर करत मनिषा कायंदे यांनी वाघ यांना सवाल केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, भाजपच्या चित्रा वाघ यांना नंगाटनाच तुम्हाला मान्य आहे का?. असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com