Chitra Wagh | Urfi Javed
Chitra Wagh | Urfi Javed Team Lokshahi

उर्फीवर चित्रा वाघ पुन्हा बरसले; म्हणाले, माझा विरोध कालही, आजही आणि उद्याही...

उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.
Published by :
Sagar Pradhan

भाजप नेते चित्रा वाघ आणि मॉडेल उर्फी जावेद यांच्यामधील वाद सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यातच चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये जोरदार टीका करणे सुरु आहे. उर्फी जावेद यांनी काही दिवसांपूर्वी याच विषयावरून चित्रा वाघ यांना ट्विटरवरून डिवचले होते. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत तिचा विरोध केला आहे.

Chitra Wagh | Urfi Javed
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आजच होणार पगार; राज्यसरकारचा मोठा निर्णय

माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. अशी ठाम भूमिका चित्रा वाघ यांनी या पत्रकार परिषदेत मांडली.

‘तिने याठिकाणी काही पानचट म्हणावं आणि आमच्या मुलांचे फोटो व्हायरल करायचे. आमच्यावर टीका करून पोट भरलं नाही, तर तुम्ही आमच्या कुटुंबावर आलात. आमचा मुलांचा राजकारणासोबत काडीचा देखील संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करायचं तुम्ही काम केले काय म्हणावं तुम्हाला. तुमच्या कुटुंबातील लोकांना विचारा हा नंगानाच त्यांना चालणार आहे का? आम्ही का भांडत आहोत. आम्ही समाजासाठी भांडत आहोत. आज जर हा आवज थांबला तर हा नंगानाच संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आणि आमची ही संस्कृती नाही, फॅशनच्या नावाखाली हे सगळं चालू देणार नाही. तुम्ही काय करायचं ते करा तुमचं प्रोफेशन आहे, त्या पद्धतीने पेहराव करा पण तुम्ही फक्त प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी चिंध्या लावून फिरताय भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी हे मान्य आहे तुम्हाला? असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com