Supriya Sule | Chitra Wagh
Supriya Sule | Chitra Wagh Team Lokshahi

‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का? सुळेंच्या विधानावर चित्रा वाघ यांचा सवाल

“मला खूप वेळा गंमत वाटते की, चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात?- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे ह्या आज पुण्यातील पिंपरी येथील पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार तरुणी आणि महिलांच्या पोषाखाबद्दल विधान केलं. प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी या पाश्चिमात्य कपडे परिधान करतात. पण त्यापेक्षा त्या साडी नेसून मराठी संस्कृतीचं जतन का करत नाहीत? असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

Supriya Sule | Chitra Wagh
भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस; मात्र, राहुल गांधी असणार उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

सुप्रिया सुळे यांच्या साडीबद्दलच्या विधानाचा व्हिडीओ चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का? असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एका पत्रकार तरुणीला आधी टिकली लाव, मग प्रतिक्रिया देईन, असे म्हंटले होते. त्यानंतर सर्वच माध्यमातून संभाजी भिडे यांच्यावर टीका केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसपासून, काँग्रेससह विविध पक्षाच्या नेत्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला होता. त्यावरूनच आता सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांनी हा सवाल केला आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

“मला खूप वेळा गंमत वाटते की, चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलता ना तुम्ही? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टनाईजेशन करतोय”, असं सुप्रिया सुळे संबंधित व्हिडीओ बोलताना दिसत आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com