Chitra Wagh | Urfi Javed
Chitra Wagh | Urfi JavedTeam Lokshahi

उर्फीच्या ट्विटला चित्रा वाघ यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाल्या, बोलली तरी...

'मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू', असे ट्विट उर्फीनं केले आहे.

राज्यात सध्या विविध विषयावरून जोरदार गदारोळ सुरु आहे. त्यातच आपल्या विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आहे. याच फॅशनमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. यावादा दरम्यान आता चित्रा वाघ यांना उर्फीने पुन्हा डिवचले आहे. 'मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू', असे ट्विट उर्फीने केले आहे. त्यावरच आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Chitra Wagh | Urfi Javed
देशमुखांना आलेल्या एसीबीच्या नोटीसवर सावंतांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, सज्जन माणसाला...

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

उर्फी जावेदच्या ट्विटला उत्तर देतांना चित्रा वाघ म्हणाल्या की, “मला यावर काहीही बोलायचं नाही. तिने कितीही काहीही लिहिलं, शब्दांची मोडतोड केली, मला काहीही बोलली तरी हा नंगानाच आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार नाही ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि यापुढेही राहिल. आमच्याकडे प्रत्येक रोगावर औषध आहे”, असे उत्तर चित्रा वाघ यांनी दिले आहे.

काय आहे उर्फीचे ट्विट?

चित्रा वाघ यांच्या आरोपांवर उर्फी जावेद ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देत आहे. उर्फीनं म्हंटले की, 'मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू', असे ट्विट तिने केले आहे. या ट्विटवरुन नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. तर, याआधी पंजाबी ड्रेसमधला फोटो शेअर करत चित्रा वाघ यांनी मला सुधरवले. लव्ह यू बेस्टी. पण, अजून खूप सुधार बाकी आहे, सॉरी, असे उर्फीने म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com