Pankaja Munde | Devendra Fadnavis
Pankaja Munde | Devendra Fadnavis Team Lokshahi

मुंडेंना आलेल्या ठाकरे गटाच्या ऑफरवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, हेच त्यांचं घर...

पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचं दार जरी उघड असलं तरी त्या दाराने पंकजा कधीच जाणार नाहीत.

राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आता शिवसेना (ठाकरे गट) आमदाराकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ठाकरे गटात येणायची ऑफर दिली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यावरच पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून आलेल्या या ऑफरवर आता महाराष्ट्रातील भाजपचे पहिल्या फळीतील एक नंबरचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde | Devendra Fadnavis
तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला, नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ठाकरे गटाच्या आमदारानी पंकजा मुंडे यांना ऑफर दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले की,पंकजा मुंडे भाजपसोडून कुठेही जाणार नाहीत, याची खात्री असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ठाकरे गटाने खुली ऑफरच दिलीय. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल हा विश्वास व्यक्त केला.

पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचं दार जरी उघड असलं तरी त्या दाराने पंकजा कधीच जाणार नाहीत. भारतीय जनता पक्ष हेच त्यांचं घर आहे. त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत. अशाप्रकारचे विधानं त्यांनी कितीही केले तरी ते राजकीय असतील. त्या विधानांना फार काही महत्त्व नसेल. असे देखील यावेळी बोलताना ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com