Eknath Khadse | Girish Mahajan
Eknath Khadse | Girish MahajanTeam Lokshahi

महाजनांचा खडसेंना इशारा, मुलाची हत्या झाली की आत्महत्या? जास्त बोलायला लावू नका...

एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं? त्याचं उत्तर खडसे यांनी द्यावं. हा विषय मला बोलायचा नाही.

भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंमध्ये अनेक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरु आहे. मात्र, आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचे प्रत्युत्तर देताना गंभीर इशारा दिला आहे. ‘मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे’, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी इशारा दिला.

Eknath Khadse | Girish Mahajan
शिंदे गटाचा गुवाहाटी दौऱ्यावर जाण्याचा मुहूर्त ठरला

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी पूर्वी गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही असता तर तो पण राजकारणात आला असता असं वक्तव्य केलं होत. त्यालाच उत्तर देतांना महाजन म्हणले की, "मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मात्र मला दोन मुली आहेत हे माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं? त्याचं उत्तर खडसे यांनी द्यावं. हा विषय मला बोलायचा नाही. मात्र ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर ते वाईट आहे. तुम्हाला एक मुलगा होता त्याचं काय झालं? आत्महत्या झाली की खून झाला हे तपासण्याची गरज आहे असे म्हणत मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, “एकनाथ खडसे आजकाल काय बोलताय त्याचं त्यांना भान राहत नाहीय. ते बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत. कधी मला चावट म्हणताहेत, तर कधी बदनामी करा म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा यात सबळ पुरावे मिळत आहेत म्हणून ते अस्वस्थ झाले आहेत”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com