Sharad Pawar | Gopichand Padalkar
Sharad Pawar | Gopichand PadalkarTeam Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसून टोळी, आज ना उद्या संपणार : गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकरांनी केली राष्ट्रवादी आणि अजित पवारांवर टीकास्त्र

संजय देसाई | सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष नसून एक टोळी आहे आणि तो आज ना उद्या संपेल, अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच, महाराष्ट्रात काय चाललंय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे बघावं, असा टोलाही पडळकर यांनी अजित पवारांना लगावला आहे. सांगलीच्या विटा या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Sharad Pawar | Gopichand Padalkar
उध्दव ठाकरे हे भविष्यात ओवेसीशी युती करतील; बावनकुळेंचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ स्थापनेपासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि तो आजपर्यंत बदलला गेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कोणत्याही प्रकारचा अजेंडा देखील नाही आणि हा पक्ष फुटणार नाही. कारण तो आज ना उद्या संपणार आहे, अशा शब्दात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निशाणा साधला आहे.

तसेच, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपण लाखाच्या मताने बारामती मधून निवडून येतो. या केलेल्या विधानाचा समाचार घेताना, लाखांच्या मताने निवडून येत असाल तर बारामती तालुक्यातील 44 गाव हे पाण्यापासून वंचित का आहेत? दुष्काळ सुरू झाला की महाराष्ट्रातून या गावांची पाण्याची टँकर देण्याची पहिली मागणी असते. याचा आधी विचार अजित पवारांनी केला पाहिजे आणि महाराष्ट्रात काय चाललंय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे बघावं, असा टोलाही पडळकर यांनी अजित पवारांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com