Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Team Lokshahi

पडळकरांचा पुन्हा पवार कुटुंबावर वार; म्हणाले, पवारांनी राज्यात अनेक घरे फोडली...

राष्ट्रवादीला अडीच वर्षात सत्तेची सूज आली होती.सत्ता गेल्यानंतर त्यांची सूज उतरली आहे.तर राष्ट्रवादीच्या पोटात आता दुखत आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना पवार कुटुंबाला नेहमी धारेवर धरणारे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा पवार कुटुंबांवर निशाणा साधला आहे. सांगली मध्ये आयोजित भाजपाच्या मेळाव्यात पडळकर यांनी हे विधान केले आहे.

Gopichand Padalkar
विभक्त पतीच्या शिंदे गट प्रवेशावर अंधारेंचे रोखठोक वक्तव्य; म्हणाल्या, त्यांचे नेमके काय चालले...

काय म्हणाले पडळकर?

भाजपच्या कार्यक्रमात बोलताना पडळकर म्हणाले की, तुम्ही राज्यात अनेक घरे फोडली, त्यामुळे तुम्ही जे पेरले तेच आता उगवत आहे. शरद पवाराच्या घरात उभी फूट पडते का असे संपूर्ण राज्यात वातावरण झाले आहे, अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या वर घणाघात केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीला अडीच वर्षात सत्तेची सूज आली होती.सत्ता गेल्यानंतर त्यांची सूज उतरली आहे.तर राष्ट्रवादीच्या पोटात आता दुखत आहे, पण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे चुन्याची गोळी असून,त्यांना ही चुन्याची गोळी दिली की त्यांची पोटदुखी बरी होईल,असा टोला असा टोला पडळकर यांनी यावेळी लगावला आहे.

सांगली जिल्हा बँकेचा गैरवापर करून भाजपच्या लोकांना त्रास दिला. राष्ट्रवादी हा पक्ष जिल्हा बँकेच्या जीवावर चालत आहे.त्यामुळे यांचे पाळेमुळे या बँकेत आहेत,ती उखडून टाकली पाहिजे. त्यामुळेच मी या बँकेच्या कारभारा विरोधात तक्रार केल्याचे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com