Mohit Kamboj
Mohit KambojTeam Lokshahi

कल से फिर मैदान, कारागृहाबाहेर येताच राऊतांना भाजपने डिवचलं

आज तब्बल 102 दिवसानंतर संजय राऊत जामीनावर जेल बाहेर आहे आहेत. मात्र, राऊत बाहेर येताच ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण असतानाच भाजपने त्यांना डिवचले आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

मागील अनेक महिन्यांपासून कोठडीत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. पीएमएल कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना हे जेल बाहेर आले आहेत. त्यामुळे आज राज्यभर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे. संजय राऊत यांना पाहण्यासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. हा सर्व जल्लोष सुरु असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना डिवचले आहे.

काय केले कंबोज यांनी ट्वीट?

लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा …. असे ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. मात्र, या ट्वीटमध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. परंतु, जेलमध्ये जाण्याआधी भाजप विरुद्ध संजय राऊत असा संघर्ष कायम पाहायला मिळाला. विविध प्रकरणावरून संजय राऊत आणि कंबोज यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राऊत बाहेर येताच हे ट्वीट केल्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राऊत असा वाद होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com