Narayan Rane| Ajit Pawar
Narayan Rane| Ajit PawarTeam Lokshahi

'माझ्या फंद्यात पडू नका नाही तर पुण्याला येऊन बारा वाजवीन' राणेंचा अजित पवारांना इशारा

शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर नारायण राणे यांना एका महिलेने पडलं. अशी टीका अजित पवार यांनी केली होती.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर नारायण राणे यांना एका महिलेने पडलं. अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर राणे कुटुंबीय या वक्तव्यावरून प्रचंड आक्रमक झाले होते. त्याच टीकेवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Narayan Rane| Ajit Pawar
शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? रोहित पवारांचा सवाल

काय दिले नारायण राणे यांनी प्रत्युत्तर?

कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, अजित दादाला बारामतीबाहेर कितपत राजकारण माहित आहे मला माहित नाही. खरं तर मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण तो ज्या प्रकारचा राजकारणी त्याबद्दल बोलू नये. आणि बारामती बाहेर दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ नये नाव ठेवायला जाऊ नये. माझ्या फंद्यात पडू नका नाही तर पुण्याला येऊन बारा वाजवीन. महिला असू की पुरुष उमेदवार उमेदवार असतो. विजयी झाला तर त्यात काय वेगळे. असे जोरदार प्रत्युत्तर राणेंनी अजित पवारांना दिले.

काय म्हणाले होते अजित पवार?

एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, 'नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना', असं अजित पवार म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com