Nilesh Rane | Aditya Thackeray
Nilesh Rane | Aditya ThackerayTeam Lokshahi

मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरेंना निलेश राणेंचा खोचक सवाल; म्हणाले, लंडनमध्ये...

लंडनमध्ये १० दिवस घालवले की नाही? लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी कुठलं शासकीय काम हाताळलं?

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्होस दौऱ्यावर गेले होते. मात्र, दौऱ्याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डाव्होसमध्ये किती तास होते. त्या ठिकाणी कोणता करार केला, त्यानंतर करार झालेल्या महाराष्ट्रातील कंपन्या होत्या. यावरून प्रचंड गदारोळ सुरु झाला. यावरूनच शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. याच टीकेवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना खोचक सवाल केला आहे.

Nilesh Rane | Aditya Thackeray
प्राचार्य मारहाण प्रकरणावर बांगरांचे उत्तर; म्हणाले, सरकार आमचंच, आम्ही काय बांगड्या...

काय म्हणाले निलेश राणे?

आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या डाव्होस दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्याचं सांगत टीका करत असताना निलेश राणेंनी त्याला ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी जाहीर करावं की मंत्री असताना डाव्होस दौऱ्यानंतर त्यांनी लंडनमध्ये १० दिवस घालवले की नाही? लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी कुठलं शासकीय काम हाताळलं?” असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com