Nilesh Rane | Ajit Pawar
Nilesh Rane | Ajit PawarTeam Lokshahi

'सात जन्मात कळणार'...पवारांच्या 'त्या' विधानाचा निलेश राणेंनी घेतला समाचार

शेतकऱ्यांना मुतून पाणी देण्याची भाषा करणारे अजित पवार यांना धर्मवीर या शब्दाचा अर्थ ह्या जन्मात काय सात जन्मात कळणार नाही.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. भाजप नेते या विधानामुळे प्रचंड आक्रमक झाले आहे. त्यावरच आता भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

Nilesh Rane | Ajit Pawar
अजित पवारांच्या विधानावर बावनकुळे आक्रमक; म्हणाले, settlement करणाऱ्यांना...

काय म्हणाले ट्विटमध्ये निलेश राणे?

भाजपा नेते निलेश राणेंनी अजित पवार यांच्या काही जुन्या पोस्ट ट्वीट केल्या आहेत. या ट्वीट्समध्ये अजित पवारांनीच छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘धर्मवीर’असा केल्याचं दिसत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये “धर्मवीर-धुरंदर राजकारणी, ज्यानं दुश्मनांचा उतरविला माज, ऐसे पराक्रमी अपुले राजे छत्रपती संभाजी महाराज, त्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा”, असं ट्वीट अजित पवारांनी केले होते. अजित पवार साहेब हे तुमचंच आहे ना??? असे म्हणत त्यांनी अजित पवारांना जुने ट्विट आठवून देण्याचे काम केले.

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, शेतकऱ्यांना मुतून पाणी देण्याची भाषा करणारे अजित पवार यांना धर्मवीर या शब्दाचा अर्थ ह्या जन्मात काय सात जन्मात कळणार नाही. अजित पवार माफी मागा... अजित पवारांचा जाहीर निषेध. असे ते म्हणाले आहेत.

काय म्हणले होते अजित पवार?

महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार कल म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com