मुंडेंचा आवाज दाबावा अशी ताकत अजूनपर्यंत राजकारण्यांत नाही; प्रीतम मुंडेंचं विधान चर्चेत

मुंडेंचा आवाज दाबावा अशी ताकत अजूनपर्यंत राजकारण्यांत नाही; प्रीतम मुंडेंचं विधान चर्चेत

भाजप नेत्या पंकजा मुंडे या मागील काही दिवसांपासून भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. प्रीतम मुंडे यांनीही नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली आहे

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे या मागील काही दिवसांपासून भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांनीही नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. आजही त्यांनी अजूनपर्यंत तरी मुंडेंचा आवाज दाबावा, अशी ताकत कोणत्याही राजकारण्यांत नाही, असे विधान केले आहे. यामुळे प्रीतम मुंडेंचा निशाणा नेमका कुणावर होता, याची चर्चा आता रंगली आहे.

मुंडेंचा आवाज दाबावा अशी ताकत अजूनपर्यंत राजकारण्यांत नाही; प्रीतम मुंडेंचं विधान चर्चेत
महाविकास आघाडीमध्ये जाण्यास तयार; प्रकाश आंबेडकरांनी ठेवली 'ही' अट

शृंगेरी येथील यात्रेत भक्तांशी संवाद साधत असताना प्रीतम मुंडे यांचा माईक बंद पडला. माईक बाजूला सारत प्रीतम मुंडे यांनी हे सर्व आवाजावरच चालते, असे म्हणत आणखी तरी मुंडेंचा आवाज दाबण्याची ताकत राजकारण्यांत नाही, असं वक्तव्य केलं. जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही, भक्त कितीही प्रामाणिक असला तरी तो दर्शनाला येऊ शकत नाही. आज माझं येणं हा देवीचा आदेश आहे. आणि त्या आदेशातून आपल्या सर्वांसाठी नक्कीच काही तरी घडणार असेल, अशी भावना प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंसमोर मनातील खदखद व्यक्त केली. तर, भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे, असे खळबळजनक विधान त्यांनी केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com