महाविकास आघाडीमध्ये जाण्यास तयार; प्रकाश आंबेडकरांनी ठेवली 'ही' अट

महाविकास आघाडीमध्ये जाण्यास तयार; प्रकाश आंबेडकरांनी ठेवली 'ही' अट

वंचित शिवसेनासोबत युती करणार की महाविकास आघाडीसोबत याबाबत संभ्रम; प्रकाश आंबेडकरांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया

नागपूर : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वीच वंचित आणि ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्यांची युतीबाबत बैठक पार पडली. मात्र, त्यानंतर अद्यापही युतीबाबत कुठलेही माहिती समोर आलेली नाहीये. त्यातच वंचित शिवसेनासोबत युती करणार की महाविकास आघाडीसोबत याबाबत संभ्रम होता. अशातच, प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीमध्ये जाण्यास तयार; प्रकाश आंबेडकरांनी ठेवली 'ही' अट
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे बदलून फक्त डिवचण्याचे काम : अबू आजमी 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सेनेसोबत बोलणी झाली आहेत. त्यांनी ठरवावं. मी आता नागपूरमध्ये आहे आणि सुभाष देसाई मुंबईत आहेत. काँग्रेस आणि एनसीपीला सोबत घेऊ असे उद्धव ठाकरे यांचे मत आहे, त्यामुळे ते ठरल्यावर आम्ही ठरवू.

आमचं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विरोध कधीही नव्हता. त्यांना पाच वेळा हरलेल्या जागा आमच्यासाठी सोडा, अशी मागणी केली होती. परंतु, आम्ही दलितांपुर्वी मर्यादित रहावं अस मत त्यांचं होतं. त्याच सामाजिक परिवर्तन झालं असल्यांचे त्यांनी सांगावे, अशी अटच त्यांनी ठेवली आहे.

उद्धव ठाकरेंसोबत आमची सगळी बोलणी झाली आहे. आता आमची बोलणी होत आहे ती शिवसेनेसोबत. पुढे काय होणार ते ठरेल. जागा वाटपाबद्दल ठरवू. मी शिवसेनेच्या शेअरिंग पार्टनरशिपमध्ये आहे की महाविकास आघाडी हे त्यांना ठरवायचे आहे, असेही सूचक विधान त्यांनी केले आहे.

दरम्यान, विदर्भाची ही निवडणूक बौद्धिक वर्गाची आहे. मिहान हा ट्रान्सपोर्ट हब होणार असल्याचे गडकरी सांगतात. मात्र, ते होऊ शकत नाही. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार लॉजीस्टिक हब होऊ शकत नाही. परंतु, सुरजागडमध्ये अत्यंत चांगलं असं लोखंड आहे. त्यामुळे ते चांगलं खनिज विदर्भातील असल्याने येथीलं औद्योगीकरण कसं वाढवता येईल हे मांडण्याची गरज आहे. येथे असणाऱ्या शिक्षणात बदल होत आहे. आयटी आणि डेव्हलप स्किलचा काळ असतांना ती पद्धत मांडण्याची गरज आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com