पहाटेच्या शपथविधीबाबत मुनगंटीवारांचा तो दावा; राऊत म्हणाले, आम्हाला...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून जुंपलेली पाहायला मिळत. याच गोंधळादरम्यान आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात मोठा दावा केला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. त्यावरच आता शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात मुनगंटीवार यांनी खळबळजनक दावा केला होता. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्या पक्षात कोणीही विचारत नाही, ते काय आम्हाला सांगत आहेत, अस संजय राऊत म्हणाले.
नेमका काय केला होता मुनगंटीवारांनी दावा?
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली. परंतु त्यानंतर विश्वासघात केला. यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.