Udyanraje Bhonsle
Udyanraje Bhonsle Team Lokshahi

संजय राऊत यांच्या निर्लज्जपणाची हद्द झाली; उदयनराजेंकडून राऊतांच्या विधानाचा समाचार

सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ती गरळ ओकत आहे त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान झालं.
Published by :
Sagar Pradhan

प्रशांत जगताप|सातारा: राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत असताना साताऱ्यात पदाधिकारी मेळावात बोलत असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यावर टीका केली होती. त्यांच्या या विधानामुळे राजकीय राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता राऊतांच्या याच टीकेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला आहे.

Udyanraje Bhonsle
औरंगजेबाने मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास दिला; खैरेंची जलील यांच्यावर जोरदार टीका

काय म्हणाले उदयनराजे?

राऊतांच्या टीकेवर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, विकृत स्वभावामुळे राऊतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जाते. त्यामुळे ही विकृती वाढत चालली आहे. राजघराण्यावर बोलताना बोलून, मोजून मापून समजून वक्तव्य केलं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. असा निशाणा उदयनराजे यांनी साधला.

पुढे ते म्हणाले की, संजय राऊत यांची विकृती इथपर्यंत पोहोचली की त्यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ती गरळ ओकत आहे त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान झालं. निर्लज्ज पणाची हद्द झाली आहे. प्रत्येक वेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे त्यांच्याविषयी बोलताना थोडी लाज तरी राखा, छत्रपतीचा आदर अनादर करण्याचा कोणाचा घास नाही. असे ते यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com