Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, ओवेसी....

सरकार मजबूत असून आमची आताची 164 आमदारांची संख्या पुढे 184 पर्यंत जाईल

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून अनेक घडामोडी राज्याच्या राजकारणात घडत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही भविष्यातील राजकीय मैत्रीचे संकेत दिले. त्याच युतीच्या चर्चेवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Chandrashekhar Bawankule
त्या गरीबांना फासावर...; आव्हाडांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चांवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबतही युती करु शकतात," अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी शिंदे- फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल या संजय राऊत यांच्या भाकितावर उत्तर देतांना म्हणाले की, आमचं सरकार पूर्ण वेळ चालणार. सरकार मजबूत असून आमची आताची 164 आमदारांची संख्या पुढे 184 पर्यंत जाईल. संजय राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही. अजूनही 20-25 आमदारांचा छुपं समर्थन आम्हाला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये." असे ते यावेळी म्हणाले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com