Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Team Lokshahi

भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चौघेच दिसतील, बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

विरोधकांनी कपटकारण करवून सत्ता मिळवली होती. म्हणून अडीच वर्षात सरकार गेले.

संजय देसाई|सांगली: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुषमा आधारे यांचे पती शिंदे गटात गेल्यावर बावनकुळे यांनी ही टीका केली आहे. ते सांगली मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Chandrashekhar Bawankule
पडळकरांचा पुन्हा पवार कुटुंबावर वार; म्हणाले, पवारांनी राज्यात अनेक घरे फोडली...

काय म्हणाले बावनकुळे?

'उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार घेऊन काम करत आहेत तरी पाहता त्यांच्यावर त्यांच्या व्यासपीठावर चौघेच बसण्याची वेळ भविष्यात निर्माण होईल, अशी टीका बावनकुळे यांनी केली. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या गटातील लोक शिंदे गटात सामील होत आहेत हे पाहिले तर भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चौघेच लोक असतील असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भास्कर जाधव यांनी फालतू धंदे करू नये. विरोधकांनी कपटकारण करवून सत्ता मिळवली होती. म्हणून अडीच वर्षात सरकार गेले. आता विरोधात म्हणून विरोधाकाची भूमिका बजावा. अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

भाजपा बरोबर सत्ता स्थापन केली होती ते बरोबर आहे असं अजित पवार यांना पण आता वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता गेल्या पासून अस्वस्थ आहे. सत्तेपासून पैसा आणि पैश्या पासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण आहे. राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकर्ता याला काही मिळत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही मिळत नाही. असे बावनकुळे यावेळी म्हणाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com