Chandrashekhar Bawankule | Pankaja Munde
Chandrashekhar Bawankule | Pankaja Munde Team Lokshahi

'पंकजा मुंडेंना बदनाम करणारा एक गट भाजपमध्येच' बावनकुळेंचे मोठे विधान

पंकजा मुंडे यांच्या रक्तात भारतीय जनता पार्टी आहे. त्या कधीच दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. या सर्व फक्त चर्चा आहेत. विरोधकांनी त्यांचा पक्ष सांभाळला पाहिजे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सर्वत्र सध्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्याच सत्ताधारी आणि विरोधकांचा शाब्दिक वाद सुरु असताना भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावरच अनेक राजकीय मंडळींकडून वेगवेगळा दावा करण्यात येतो. हे सर्व सुरु असताना आता पंकजा मुंडेंबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.

Chandrashekhar Bawankule | Pankaja Munde
"शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार" अमोल मिटकरींचे खळबळाजनक विधान

आज माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत. पंकजा मुंडे यांच्या रक्तात भारतीय जनता पार्टी आहे. त्या कधीच दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. या सर्व फक्त चर्चा आहेत. विरोधकांनी त्यांचा पक्ष सांभाळला पाहिजे. पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांनी अफवा पसरवू नये. त्या प्रगल्भ नेत्या आहेत. त्या राष्ट्रीय राजकारणात आहेत. त्यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. पंकजा मुंडे यांना कोणीही फूस लावू शकत नाही, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला होता.

पुढे त्यांना पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की. पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांच्याशी परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठिक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची व्यस्तता वेगळी असते. आज देवेंद्र फडणवीस बीडमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून गेले आहेत. त्या कार्यक्रमाला एखादा आमदार नसेल तर त्याने दांड मारली असे म्हणायचे का? एक नेता गेल्यानंतर दुसरा नेता हजर राहणे गरजेचे आहे का? एकाच कार्यक्रमाला चार-पाच नेत्यांना अडकवून कशाला ठेवायला हवे. त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केलेले कधीही चांगले. कोणताही वेगळा अर्थ काढू नये. पंकजा मुंडे या नेत्या आहेत. त्यांचेही वेगळे कार्यक्रम आहेत,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com