Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Team Lokshahi

महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात काय केले? पंतप्रधानांच्या टीकेनंतर भाजपच्या आणखी एक मंत्र्यांचा सवाल

शिंदे-फडणवीसांचे डबल इंजिन सरकार सहा महिन्यांपुर्वी सत्तेवर आले आणि रखडलेल्या सगळ्या महत्वाच्या, विशेषतः मुंबईकरांच्या प्रकल्पांना मंजुरी देत कामे सुरू केली.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. परंतु, त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सत्तातरानंतर पहिल्यांदा मुंबईत आले. यावेळी त्यांच्या या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी आज त्यांच्याकडून अनेक विकास कामांचे देखील लोकार्पण करण्यात आले. परंतु, बीकेसी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यावरच भाजप मंत्री अतुल सावे यांनी मोठा दावा केला आहे.

Mahavikas Aghadi
पंतप्रधानांचा पाय मुंबईतून निघत नाही तर ठाकरे गटाचे जोरदार प्रत्युत्तर; 'अफलातून खोट....

नेमकं काय केला सावेंनी दावा?

राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात काय केले? हे जनतेसमोर मांडावे, आमचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यात आम्ही कोणते निर्णय घेतले हे सांगितले आहे? शिंदे-फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकार आल्यावर राज्यातील विकासकामांना वेग आल्याचा दावा सावे यांनी केला.

महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष सत्तेवर होते, पण त्यांच्या काळात विकासकामे पुर्णपणे ठप्प होती. काय केले हे सांगण्यासारखे नसल्यामुळेच महाविकास आघाडी आपले रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर करू शकली नाही.

शिंदे-फडणवीसांचे डबल इंजिन सरकार सहा महिन्यांपुर्वी सत्तेवर आले आणि रखडलेल्या सगळ्या महत्वाच्या, विशेषतः मुंबईकरांच्या प्रकल्पांना मंजुरी देत कामे सुरू केली. सहा महिन्यात आमच्या सरकारने काय केले याचे रिपोर्ट कार्ड आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. मुंबई आणि राज्याचा विकास शिंदे-फडणवीस सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात, असा दावा देखील सावे यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com