Atul Bhatkhalkar
Atul BhatkhalkarTeam Lokshahi

राहुल गांधीवरून भातखळकरांची ठाकरे गटावर विखारी टीका; म्हणाले, मिठी मारून लायकी...

भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांचे सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान

महाराष्ट्रात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. परंतु, या भारत जोडो यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण भयंकर तापले आहे. या विधानामुळे भाजप आणि शिंदे गट चांगलेच आक्रमक झाले आहे. या विधानामुळे भाजप शिवसेना (ठाकरे गटावर) हल्ला चढवत आहे. त्यावरच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

Atul Bhatkhalkar
मनसेसैनिकांचा ताफा पोलिसांनी चिखलीत अडवला; नितीन सरदेसाईंना घेतले ताब्यात

काय म्हणाले भातखळकर?

राहुल गांधी यांच्या विधानावरून ठाकरे गटावर निशाणा साधताना भातखळकर म्हणाले की, राहुल गांधी यांना मिठ्या मारुन शिउबाठाने आपली लायकी दाखवलेली आहे, आता सारवासारव करून उपयोग नाही. तुमचे उरलेले आयुष्य इटालियन गांधींची धुणी भांडी करण्यातच जाणार आहे. अश्या शब्दात त्यांनी ट्विटरवरून ठाकरे गटावर टीका केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अनेकवेळा इंग्रज सरकारला माफीची पत्रे लिहिली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com