Atul Bhatkhalkar | Uddhav Thackeray
Atul Bhatkhalkar | Uddhav ThackerayTeam Lokshahi

कलानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काढता येईल का? भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

काही दिवसांनी राजकीय पक्ष चालवण्या इतपत मनुष्यबळ उरणार नाही हे दिसतेच आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच विविध विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. याच वादादरम्यान आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना ठाकरे गटावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटामधून सध्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गळती सुरु आहे. त्यावरच बोलत भातखळकर यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Atul Bhatkhalkar | Uddhav Thackeray
"स्वतःचे खोके आणि दुसऱ्यांना धोके" आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकार निशाणा

काय म्हणाले अतुल भातखळकर?

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अतुल भातखळकर म्हणाले की, काही दिवसांनी राजकीय पक्ष चालवण्या इतपत मनुष्यबळ उरणार नाही हे दिसतेच आहे. तेव्हा… कलानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काढता येईल का? असा खोचक सवाल भातखळकर यांनी ट्विटरवरून ठाकरेंना केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com