तुमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही… जाळीदार टोप्यांचे....भातखळकरांची ठाकरेंवर विखारी टीका
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच भाजप आणि शिवसेना ठाकरे गट संघर्ष तर कायमच दिसतो. एका कार्यक्रमात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना आमचे हिंदुत्व हे केवळ शेंडी, जानवे आणि घंटा वाजवण्यापुरते नाही. असे विधान केले होते. त्यावरच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचा फोटो शेअर करत विखारी टीका केली आहे.
काय आहे भातखळकरांचे ट्विट?
आमचे हिंदुत्व हे केवळ शेंडी, जानवे आणि घंटा वाजवण्यापुरते नाही. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ते म्हणाले, आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही… जाळीदार टोप्यांचे आहे, बरं का. असा विखारी सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
कुठला आहे हा फोटो?
आज बीड जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचा उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील होत्या. त्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करतानाचा उद्धव ठाकरेंचा हा फोटो आहे.