Babanrao Lonikar | Prasad Lad
Babanrao Lonikar | Prasad LadTeam Lokshahi

शिवरायांच्या विरोधात अपशब्द काढणाऱ्यांच्या 100 पिढ्या बरबाद होतील, लोणीकारांचा लाड यांना घरचा आहेर

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना माहिती घेऊन अभ्यास करून आणि आदरयुक्तच बोललं पाहिजे.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात मागील काही दिवसांपासून एकच राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे सतत राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानाचे सत्र सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद कायम असताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त विधान केले त्यामुळे ते वादात सापडले आहेत. त्यावरच आता भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसाद लाड यांना घरचा आहे दिला आहे. छत्रपती शिवरायांच्या विरोधात अपशब्द काढणाऱ्यांच्या 100 पिढ्या बरबाद होतील. असे ते यावेळी म्हणाले.

Babanrao Lonikar | Prasad Lad
आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही, बच्च कडूंचा ठाकरेंना टोला

राज्यात शिवरायांबद्दल करण्यात येत असलेल्या वादग्रस्त विधानावर बोलतांना लोणीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्र किंवा भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आदर्श राजे होते आहेत आणि राहतील. त्यामुळे सर्वपक्षीय राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या लोकांच्या शंभर पिढ्या बरबाद होतील, परंतु शिवरायांचा आदर्श मिटणार किंवा संपणार नाही असे भाजप आमदार बबनराव लोणीकर म्हणाले आहे.

राजकीय पक्षांच्या नेत्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ राजकारणाचा विषय नसून, जनतेच्या कल्याणासाठी लोकोपयोगी राज्य कारभार कसा चालवावा याचा आदर्श प्रत्येक राजकीय व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. महाभारतामध्ये शिशुपालाच्या शंभर अपराधानंतर त्याचा देखील अंत झाला होता. असा दाखला देत लोणीकर यांनी सर्व पक्षीय राजकारन्यांना खडे बोल सुनावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना माहिती घेऊन अभ्यास करून आणि आदरयुक्तच बोललं पाहिजे असेही लोणीकर यांनी सर्वपक्षीय राजकारण्यांना ठणकावले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com