Ganpat Gaikwad Firing: गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाडांची प्रतिक्रिया; म्हणाले की.....

Ganpat Gaikwad Firing: गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाडांची प्रतिक्रिया; म्हणाले की.....

उल्हासनगरमध्ये पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

उल्हासनगरमध्ये पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. गणपत गायकवाडांनी ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. जखमी महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणपत गायकवाड माध्यमांशी बोलताना आपली बाजू सांगितली आहे.

माध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, पोलीस स्टेशनच्या दरवाज्यामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. माझ्या जागेवर यांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्राभर फक्त गुन्हेगार पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगार बनवलं आहे आणि या गोष्टीमुळे माझा मनस्ताप झाला आणि म्हणून मी गोळीबार केली.

मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार सर्व ठिकाणी पाळून ठेवले आहेत. मी बऱ्याचदा वरिष्ठांना याबद्दल सांगितलं आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता. संध्याकाळी 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले. माझ्या मुलाला धक्काबुक्की केली असे गणपत गायकवाड यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

Ganpat Gaikwad Firing: गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाडांची प्रतिक्रिया; म्हणाले की.....
Mla Ganpat Gaikwad Firing: उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

गणपत गायकवाड यांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com